कॉफी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉफी

कॉफी हे एक पेय आहे. कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.

इतिहास[संपादन]

ऐतिहासिक दाखल्यांनुसार अरब व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, उंटांनासुद्धा बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.

भौगोलिक परिसर, हवामान, जमिनीचा पोत यानुसार कॉफीची प्रतवारी ठरते. अर्थातच त्यामुळे अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम आणि कनिष्ठ (निकृष्ट) अशा प्रकारचे कॉफीचे पीक निर्माण होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.