मराठी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडियाचा लोगो
स्क्रीनशॉट
मराठी विकिपीडियाचे मुखपृष्ठ (२८ ऑगस्ट, इ.स. २०१०)
दुवा http://mr.bywiki.com/
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
व्यावसायिक? चॅरिटेबल
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
नोंदणीकरण वैकल्पिक
आशयाचा परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सँगर
अनावरण मे १, इ.स. २००३

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, इ.स. २०१६ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. इ.स.डिसेंंबर २०१७ मधे मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत.

विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येउ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल.

आरंभ[संपादन]

औदुंबर (कविता) आणि वसंत पंचमी या लेखांचे १ मे, इ.स. २००३ रोजी झालेली पहिली मराठी विकिपीडियावरील सर्वांत जुनी ज्ञात संपादन आहेत.

मराठी विकिपीडियावरील टीका[संपादन]

'दैनिक प्रहार;चे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे. [१]

तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणेणं, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच , कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, अस विकिपीडियातही दिसते.[१]


येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.[१]संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे.

संदर्भ दर्शवा[संपादन]

  1. १.० १.१ १.२ विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी![मृत दुवा], ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनिटांनी पडताळली वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर १६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

बाह्य दुवे[संपादन]