येशू ख्रिस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

{{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = येशू | चित्र = Cefalù Pantocrator retouched.jpg | चित्र_आकारमान = 220px | चित्रशीर्षक = | चित्रशीर्षक_पर्याय = | जन्मनाव = | जन्म_दिनांक = c. 4 BC | जन्म_स्थान = बेथलेहेम | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = जेरुसलेम | मृत्यू_कारण = मानवजातीच्या पाप क्षमेसाठी क्रूसावर बलिदान देणे | कलेवर_सापडलेले_स्थान = | चिरविश्रांतिस्थान = | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = | निवासस्थान = | राष्ट्रीयत्व = | टोपणनावे = | वांशिकत्व = | नागरिकत्व = ज्यू | शिक्षण = | प्रशिक्षणसंस्था = | पेशा = | कारकीर्द_काळ = | मालक = | प्रसिद्ध_कामे = [[मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे] | मूळ_गाव = नाझारेथ | पगार = | निव्वळ_मालमत्ता = | उंची = | वजन = | ख्याती = | पदवी_हुद्दा = परमेश्वराचा पुत्र (जगाचा तारणारा) | कार्यकाळ = | पूर्ववर्ती = | परवर्ती = | राजकीय_पक्ष = | विरोधक = | संचालकमंडळ = | धर्म = | जोडीदार = | अपत्ये = | वडील = योसेफ (जागतिक पिता | आई = मारिया | नातेवाईक = | पुरस्कार = | स्वाक्षरी = | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = | संकेतस्थळ = | तळटिपा = | संकीर्ण = }}

येशू ख्रिस्त (इ.स.पू. ८ ते २ - २९ ते ३६ यादरम्यान) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र (मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.

नावाचा अर्थ[संपादन]

मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की,

वह पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्‍योंकि वह अपके लोगोंका उन के पापोंसे उद्वार करेगा। (हिन्‍दी)
तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून मुक्त करेल.

येशू ख्रिस्ताला, 'इब्री(हिब्रू) भाषेत यशुआ तर ग्रीक भाषेत येसूस' म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, त्‍याचा अर्थ सोडविणारा, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळते अशी ख्रिश्चन लोकांची कल्पना आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)

ख्रिस्‍त्‍ा हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्‍हे नावाच्या देवाकडून ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, असा समज आहे..

जन्म[संपादन]

File:Nativity tree2011.jpg

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात ( सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो.[१]

मृत्यू[संपादन]

येशू ख्रिस्त

येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे,असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्यांचा मृत्यू सुळीवर चढवून झाला.

संदर्भ[संपादन]