विकिपीडिया:कौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या पाना संबंधीच्या उपपानांचे दुवे उजवीकडील सुचालानात पहावेत. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎ मुखपृष्ठ सदर लेखासंबधीचे कौल घेतले जातात.विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे प्रचालक पदाचे कौल घेतले जातात. इतर कौल येथे खाली घ्यावेत.

हे पान मराठी विकिपीडियावरील सर्व सदस्यांचा सर्वसाधारण कौल अजमावण्या करीता आहे.कौलांमध्ये सुस्पष्ट आणि संक्षीप्त पण नेमके प्रश्न असावेत आणि सोबत नेमक्या पर्यायांचा संच असावा ०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.

दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव[संपादन]

कौल प्रक्रिया मुदत[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

सध्या मराठी विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत आहेत -

०. चर्चा पानांवर किंवा इतरत्र सदस्यांमध्ये चर्चा होते, त्यातून असलेल्या धोरण किंवा संकेतांपेक्षा वेगळे धोरण/संकेत करण्याची कल्पना पुढे येते.

  1. ध्येय आणि धोरणे चावडीवर (या पानावर) अधिकृतरीत्या चर्चा सुरू होते.
  2. या पानावर, याच्या उपपानावर किंवा कौलपानावर रीतसर प्रस्ताव मांडला जातो.
  3. तेथे चर्चा चालू राहते त्याचबरोबर कौल देणेही सुरू होते.
  4. चर्चेचा ओघ कमी झाल्यावर प्रचालक कौलासाठी मुदत देतात.
  5. मुदत संपल्यावर कौलमोजणी होऊन त्यातील अवैध कौल वगळले जाताता.
  6. निकाल जाहीर होतो.

यातील ० आणि १ हे नेहमी होतेच असे नाही.

या प्रक्रियेत अनेकदा कौल घेण्यास उशीर होतो वर कौल नेमका कधी संपेल हे वरकरणी लक्षात येत नाही. पूर्वी मराठी विकिपीडियावरील संपादकांची संख्या कमी असताना असे असणे योग्य होते, किंबहुना स्वागतार्ह होते कारण अशा दीर्घ मुदतीमुळे क्वचित काम करणाऱ्या सदस्यांनाही त्यांचा कौल देण्याची संधी मिळत असे. आता सुदैवाने येथील संपादकसंख्या वाढली आहे व धोरणे ठरविणे तसेच इतर कौल घेणे शक्य तितक्या लवकर (पण निष्पक्षपातीपणे) पार पडणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अधिक योग्य आहे.

असे असता वरील प्रक्रिया किंचित बदलली जावी व त्याला ठाम मुदत मिळावी यासाठी मी खालील प्रस्ताव मांडत आहे.

प्रस्तावित प्रक्रियेनुसार कोणताही कौल कमीतकमी २१ दिवस चालू राहील. असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल. याच बरोबर कोणताही कौल जास्तीतजास्त ३५ दिवस चालू राहील.

अभय नातू (चर्चा) ०२:१९, २८ एप्रिल २०१८ (IST)

प्रस्ताव[संपादन]

विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत पाळले जातील -

१ कोणताही कौल घेण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे प्रस्ताव मांडला जावा.

१.१ उत्पात आणि खोडसाळ प्रस्ताव प्रचालक काढून टाकतील. इतर सदस्यांनी येथे फेरफार करू नये.

२ अपूर्ण, असंबद्ध किंवा अर्थबोध न होणारे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलविले जातील.

२.१ इतर सदस्यांनी प्रस्तावात फेरफार करू नये.

३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.

४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.

५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.

६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.

चर्चा[संपादन]

असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल कृपा याला स्पष्ट करा.

प्रत्येक कौल कमीतकमी ३ आठवडे चालू राहणार असल्याने १५ दिवसांनी येथे संपादन करणाऱ्या सदस्यास हा कौल दिसेल व आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल.
जर कौल ८ दिवसांत संपला तर अशा सदस्यांना १५ दिवसांनी आल्यावर कौल सुरू होउन संपलेलाच दिसेल.
अभय नातू (चर्चा) ०७:३९, २८ एप्रिल २०१८ (IST)

कौल प्रक्रियेत पाळीव खातीविकिपीडिया:स्लीपर अकाउंट याबाबत जर या प्रस्तावात काही संकेत भेटले तर उत्तम. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:०६, २८ एप्रिल २०१८ (IST)

होय, यासाठीही चर्चा होणे आणि धोरण ठरविणे आवश्यक आहे.
तुमचे मत ध्येय आणि धोरणे चावडीवर मांडून चर्चेची सुरुवात केल्यास इतर सदस्यही आपले मत देतील.
अभय नातू (चर्चा) ०७:३९, २८ एप्रिल २०१८ (IST)


निदान मला तरी, तीन आठवड्याचा वेळ खुप जास्त आहे असे वाटते, शिवाय
# अनेक ध्येय धोरणे आत्तापर्यंत ठरवलीच गेलेली नाहीत, येत्या काळात ती(लेखांची प्रतवारी, पहारा गस्तीच्या शिस्तबध्द पध्दती, अनेक अवजारे, GUI चे भाषांतर सुधारणे, नकल-डकव सारखे इतर अनेक मुद्दे आहेत.) ठरवली जावीत असे वाटणाऱ्या अनेक सदस्यांपैंकी मी असल्याने मला हा काळ जास्त वाटत आहे.
# 15 दिवसांनी येणारे सदस्य असे कारण सर्वांना जोडून घेणारे वाटत असले तरीही व्यवहार्य कितपत आहे हे मला चाचपडता येत नाहीये.
# शिवाय, टायवीन म्हणत आहेत तसे, कौल प्रक्रियेमध्ये, फ़क्त कौल देण्यासाठी खाती उघडून य़ेणारे सदस्य, हितसंबंधांच्या रक्षणासाठी चर्चा चालवून कौलात खिळ घालणारे सदस्य(पाळीव खातीविकिपीडिया:स्लीपर अकाउंट) यांवर आळा बसावा अशीही काहीतरी व्यवस्था असावी असे वाटते. त्यासाठी कौल देणारे सदस्य थोडा काळ घालवलेले आणि काही संपादने केलेले असे असावेत असे मला वाटते जेणेकरुन, फ़क्त त्या कौलासाठी अचानक समोर येऊन, दीर्घकालीन परिणामाला कारण बनणे थांबवता येईल.
# म्हणून मी 8/10 दिवसांचा कालावधी धोरणे ठरविण्यासाठी पुरेसा असावा असा अंदाज करत आहे, त्यातही दिवस वाढवून घेणे जोडून पहाता ते 15/17 दिवस होतीलच ज्यांत 15 दिवसांनी येणारे लोक सहभागी होतीलच किंवा कधी-कधी नाही होऊ शकणार पण आपण तसेही सर्व सक्रिय सदस्यांचा सहभाग अपेक्षित धरतच नाही काही सदस्यच ध्येय धोरणांच्या चर्चेत आणि जडण-घडणीत सहभागी होतात. फ़ारतर प्रत्येक चर्चेचे मुद्दे मांडणाऱ्या व्यक्तिने आपल्याला वाटत असलेल्या त्या धोरणांशी संब्ंधीत असणाऱ्या/मते असणाऱ्या सदस्यांना साद देणे हा एक रस्ता हातात आहेच. इतरांची मते ऐकायला आवडेल!!!
# दिवस कमी करुन, बाकी प्रक्रिया मला पुर्णपणे मान्य आहे. --Sureshkhole (चर्चा) ०९:०२, २८ एप्रिल २०१८ (IST)

@सुबोध कुलकर्णी:@आर्या जोशी:@Pushkar Ekbote:@:@Pooja Jadhav:@सुबोध पाठक: आपले बहुमोल मत ध्येय धोरणांच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर नक्की नोदवा. --WikiSuresh (चर्चा) ०९:०७, २९ एप्रिल २०१८ (IST)

नमस्कार! कौल प्रक्रियेत येणारे विविध मुद्दे अद्याप चर्चिले गेलेले नाहीत आणि त्यावर काम तर करायला हवे आहे. विकीवर अनेक जुने संपादकही आहेत, पण माझा अनुभव असा आहे की असे संपादक सक्रिय नसून केवळ ध्येय धोरणे याबद्दल मते मांडतात आणि स्वतः:ची व्यक्तिगत कुरघोडीही यानिमित्ताने पूर्ण करून घेतात. महिला दिनाच्या निमित्ताने मी टाकलेल्या विनंतीला गृहीत धरून असे काही संपादक मंडळींमध्ये दिसून आले आहे ज्याचे वाईटच वाटले त्यामुळे नियमित काम करणारे-या व्यक्ती या प्राधान्यक्रमात असाव्यात आणि त्यासाठी आठवडाभर पुरेसा आहे. जे प्रत्यक्ष काम करीत आहेत त्यांचा कौल हा अनुभवजन्य असेल. तसेच सर्व चर्च या प्रगल्भतेने व्हाव्या, त्यात वैयक्तिक आकस असू नये. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) १२:१८, २९ एप्रिल २०१८ (IST)

कौल साठीची मुदत कमीतकमी २१ दिवस व जास्तीतजास्त ३५ दिवस असावी, यावर मी सहमत आहे. कारण विकिपीडियामध्ये केवळ सक्रिय सदस्यांचाच विचार केला जाऊ नये तर आठवड्यातून वा महिन्यातून विकिवर काहीवेळा येणाऱ्या सदस्यांचाही विचार व्हायला हवा. कौल प्रकिया ही कुठे मर्यादित नसून सर्वसमावेशक असावी, त्यासाठी २१-३५ दिवसाचाच कालावधी असणे योग्य आहे.--संदेश हिवाळेचर्चा १६:१७, २९ एप्रिल २०१८ (IST)

माझे मते कौल मुदत प्रस्तुत प्रकार असावी.

क्रिया चर्चा कौल एकूण
तांत्रिक (विकीवर नवीन गॅजेट/फीचर) N.A
धोरण १०/१७* +७ १७
प्रचालक २१ २१ २१
पान काढण्याची चर्चा/कौल
आपत्कालीन प्रस्ताव (कार्यशाळा/सुरक्षा)
_________________________ ____ ____ ____
*परिस्थितीनुसार बदला
यात दिवस वाढवू जाऊ शकतात

याच बरोबर {{कौल}} साच्यात नवीन परामीटर W (withdraw nomination) ND (not done) आणि D (done) असे सुद्धा असावी. मुदत असणे आवश्यक वाटते परंतु कौल देणारे फक्त विकिपीडियावर भर टाकणारे सदस्य असावे. यासाठी ३० दिवसात ५० संपादने व एकूण मराठी विकिपीडियावर ५०० संपादन केलेले सदस्य फक्त कौल देतील अशी व्यवस्था असावी. चर्चा/मत देण्यात काहीही अडथळा/पबंदी नसावी, यांनी नवीन सदस्यांना कौल प्रक्रियेत शामिल होण्यास संधी मिळेल. प्रचालकांना अपात्र असलेली कौल strikeout करण्यास अधिकार असावा. @अभय नातू: यांनी यावर सुद्धा सोचावे व इतर सदस्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन पुन्हा या प्रस्तावाची रचना करावी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:३४, ३० एप्रिल २०१८ (IST) @अभय नातू: यावर अंतिम निर्णय घ्या --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:२३, २५ मे २०१८ (IST)

या प्रस्तावावर फक्त दोन मते पडली आहेत. मला वाटते की हा प्रस्ताव साइटनोटिसवर घालून अधिक मते मागावी.
अभय नातू (चर्चा) १९:३३, २५ मे २०१८ (IST)

कौल[संपादन]

  • Symbol strong support vote.svg संदेश हिवाळे 
  • Symbol strong support vote.svg सुबोध कुलकर्णी